फलटण – फलटण शहरात १६ ऑक्टोबरपासून दैनंदिन २०% पाणी कपात; स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आदेश फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी काढले आहेत
महाराष्ट्रात अल-निनोच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार फलटण नगर परिषदेने शहरामध्ये पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.
१६ ऑक्टोबर २०२६ पासून फलटण शहरात दैनंदिन पाणी पुरवठ्यामध्ये २०% कपात केली जाईल. पुढील आदेश येईपर्यंत शहरातील सर्व स्विमिंग पूल आणि सर्व प्रकारची वाहने धुण्याचे (वॉशिंग सेंटर) केंद्र पूर्णपणे बंद ठेवावे लागतील. महाराष्ट्र शासनाच्या ५ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार (क्रमांक: संकीर्ण-२०२६/प्र.क्र.५०/२०२६/सिं.व्य.(घो.)) हा निर्णय घेण्यात आला आहे.
फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव आणि पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापती राहुल निंबाळकर यांनी शहरातील सर्व नागरिकांना या निर्णयाची नोंद घेऊन नगर परिषदेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.