फलटण – फलटणकारांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या येथील प्रसिद्ध माळजाई देवी मंदिरात घटस्थापना, अभिषेक व महाआरती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समिती, फलटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र व दसरा महोत्सवाची सुरुवात रविवार, दि. ११ ऑक्टो. रोजी घटस्थापनेने झाली . यानिमित्त माळजाई देवी मंदिरात सकाळी अभिषेक व आरती, तसेच सायंकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. घटस्थापना, माळजाई देवीचा अभिषेक व आरती श्री. व सौ. मीत महेशशेठ गरवालीया यांच्या शुभहस्ते व गरवालीया कुटुंबीयांच्या उपस्थितीत संपन्न झाली .
सायंकाळी ७ वाजता माळजाई देवीची महाआरती लायन्स क्लब फलटणचे अध्यक्ष रणजित बर्गे व लायन्स क्लब परिवारातील सर्व सन्माननीय सदस्यांच्या उपस्थितीत झाली.
Back to top button
