स्थानिक

दि. ११ रोजी फलटण येथे भव्य मुस्लिम वधू वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन

फलटण – अल – निकाह मुस्लिम मैरिज ब्यूरो, फलटणतर्फे रविवार दि. ११ रोजी सकाळी १०. ३० वाजता भव्य मुस्लिम समाज वधु वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन नामदेवराव सूर्यवंशी बेडके महाविद्यालय फलटण येथे करण्यात आले आहे.

  या मेळाव्यास श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सचिनभैय्या सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाचे सदस्य महेंद्रभैय्या सूर्यवंशी (बेडके),बादशाही मस्जिद ट्रस्टचे चेअरमन सलीमभाई शेख (वस्ताद ),चांदतारा मस्जिदचे चेअरमन रफिकभाई आतार,अक्सा मस्जिदचे चेअरमन अब्दुलभाई शेख उर्फ अत्तुशेठ , नुरानी मस्जिदचे चेअरमन फिरोजभाई शेख, हिंदुराव नाईक निंबाळकर मस्जिद दर्गा मलटणचे चेअरमन जावेदभाई शेख, कुरेशीनगर मस्जिदचे चेअरमन हाजी नियाजअहमद कुरेशी, जाधववाडी मज्जिदचे चेअरमन हासीमभाई शेख नगरसेवक पप्पूभाई शेख,फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सिराजभाई शेख, माजी नगरसेवक नसरुद्दीन शेख, माजी नगरसेवक फिरोज आतार,माजी नगरसेवक असिफ उर्फ बाळासाहेब मेटकरी,आतार, मुस्लिम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष हाजी निजामभाई आतार, सोलापूर रेल्वे मंडळ सल्लागार समितीचे सदस्य रियाझभाई इनामदार,अहद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मेहबूबभाई मेटकरी,भाजपा अल्पसंख्याक सेलचे शहर अध्यक्ष अस्लम (बबलू) मोमीन, राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अल्ताफभाई पठाण, स्वराज पतसंस्थेचे संचालक लतीफभाई तांबोळी सामाजिक कार्यकर्ते जाकीरभाई कुरेशी,जमशेदभाई पठाण, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष वसिम मणेर, मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष समीर तांबोळी,सैफुल्ला शेख,ऍड.मुरादभाई इनामदार,शाकीर महात, सादिकभाई बागवान,मुराद इनामदार,मुश्ताकभाई मेटकरी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, महावितरण उस्मानभाई शेख मोनिता ग्रुपचे संचालक जावेदभाई तांबोळी, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक कय्युमभाई मुल्ला, माजी नगरसेवक फिरोजभाई शेख ,महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स, फलटणचे सलीमभाई आतार,आदर्श ट्रान्सस्फोर्ट, फलटणचे उस्मानभाई तांबोळी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी मल्टी जिनीयस प्रोफेशनल्स प्रा. लि.पुणे व लंडनचे चेअरमन फिरोजभाई शेख हे करिअर विषयी मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुक वधू-वर पालक यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button