स्थानिक

के. बी., गॅलेक्सी उद्योग समूह आणि रक्षक रयतेचा न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

हजारो महिलांची उपस्थिती

फलटण – के. बी. एक्सपोर्ट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड, गॅलेक्सी मल्टीस्टेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड आणि रक्षक रयतेचा न्यूज& इव्हेंट टीम यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गगनगिरी ज्वेलर्स यांच्या सहकार्याने भव्य हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी हजारो महिलांनी हळदी कुंकू समारंभाचा लाभ घेतला.

 मकर संक्रांतीचे औचित्य साधून भव्य हळदीकुंकू समारंभाचे आयोजन महाराजा मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते.

 या हळदीकुंकू समारंभासाठी येणाऱ्या प्रथम एक हजार महिलांना के.बी. आणि गॅलेक्सी उद्योग समूहातर्फे आकर्षक वाण आणि नाश्ता दिला गेला. तसेच यावेळी उपस्थित महिलांना लकी ड्रॉ मध्ये सुद्धा भाग घेता घेता आला. लकी ड्रॉ साठी हजारो रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. त्यामध्ये नेकलेस,मोत्यांचा हार,पैठणी तसेच इतर आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती.

 या भव्य हळदी कुंकू समारंभास माजी सातारा जिल्हा परिषद सदस्या ऍड सौं जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौं प्रियांका चव्हाण,फलटण नगरपालिकेच्या नूतन उपनगराध्यक्षा सौ प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले, माजी नगरसेविका सौ मधुबाला भोसले सुरवडीच्या सरपंच सौ शरयू साळुंखे पाटील, भाजपच्या महिला तालुकाध्यक्ष सौ उषाताई राऊत, सौ स्वाती चोरमले आदींनी भेट दिली. सर्वांचे स्वागत केबी उद्योग समूहाच्या संचालिका सौं सुजाता सचिन यादव यांनी केले.

 

 के.बी उद्योग समूह आणि गॅलेक्सी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती यावेळी सौं सुजाता यादव यांनी दिली. प्रत्येक सामाजिक उपक्रमास के.बी उद्योग समूह मदत करत असून आज केबी उद्योग समूहाच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. या हळदीकुंकू समारंभास मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

 यावेळी सुर संगीत हा सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर गणेश शिंदे,सौ अनुराधा रणवरे यांनी सादर केला त्याला उपस्थित महिलांनी मोठा प्रतिसाद दिला.

 रक्षक रयतेचा न्यूज आणि इव्हेंट टीम मार्फत महिलांसाठी दर महिन्याला आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाविषयीची माहिती सौं नंदा बोराटे यांनी दिली. 

 प्रारंभी हळदी कुंकू समारंभाचे उद्घाटन द्विप प्रज्वलनाद्वारे सौ सुजाता यादव यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button