स्थानिक

फलटण नगरपालिकेच्या विविध समित्यांच्या सभापती निवडी बिनविरोध पार

फलटण – फलटण नगर परिषदेचे विविध समितीचे विशेष सर्व साधारण सभा आज रोजी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी खालील समित्यांच्या सभापतींच्या निवडी करण्यात आल्या.यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळूंखे पाटील, राष्टवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

१) सार्वजनिक बांधकाम समिती -सोमाशेठ जाधव 

२) शिक्षण, क्रिडा व सांस्कृतिक कार्य समिती – सौं प्रियदर्शनी भोसले 

३) स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती – सचिन अहिवळे 

४) पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण समिती- राहुल निंबाळकर 

५) नियोजन व विकास समिती- संदीप चोरमले 

६) महिला व बालकल्याण समिती सभापती – सौं मोहिनी हेंद्रे 

उपसभापती – सौं कांचन व्हटकर 

७) मागासवर्गीय दुर्बल घटक कल्याणकारी समिती – सौं सुपर्णा अहिवळे यांच्या निवडी बिनविरोध झाल्या.

निवडीनंतर सर्वांचा पदग्रहण समारंभ उत्सहात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button