परमेश्वर भक्ती आणि आई वडिलांची सेवा हाच परमेश्वर कृपेचा मोठा मार्ग – प. पु. राजनकाका देशमुख महाराज

फलटण- श्री स्वामी समर्थ हे नाम सातत्याने घेतल्यास जी प्रचिती येईल ती अद्भुत असेल भगवंताचे नाम मोठे आहे हे भगवंतांनी सांगितले आहे नामामुळे वाल्याचा वाल्मिकी झाला होता त्यामुळे कलियुगात जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर नामशिवाय पर्याय नाही.परमेश्वर भक्ती आणि आई वडिलांची सेवा हाच परमेश्वर कृपेचा मोठा मार्ग असल्याचे मनोगत येथील आधायत्मिक क्षेत्रातील परमपूज्य राजनकाका देशमुख महाराज यांनी व्यक्त केले.


स्वामी समर्थ सेवा मंडळ, बुधवार पेठ,शिवाजी रोड फलटणच्यावतीने प. पु .राजनकाका देशमुख महाराज यांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज यांच्या 148 वी पुण्यतिथी (महासमाधी दिन) दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन दिवसभर नवलबाई मंगल कार्यालय फलटण येथे करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
प. पु.राजनकाका देशमुख महाराज यांनी आपल्याला सुंदर आयुष्य भगवतानी दिलेले आहे. या आयुष्याचे मोठे उपकार त्यांनी केल्याने भगवंताचे स्मरण वेळ मिळेल तेव्हा सातत्याने करने गरजेचे आहे.
भगवंताची नित्य सेवा करीत चला जो मनोभावे आई वडिलांची सेवा करेल,कोणाचे मन दुखावणार नाही अशांच्या पाठीशी मी असणार आहे असे स्वामींनी सांगितले असून आजच्या युगात राग,द्वेष ही भावना अनेकांच्या मनात वाढत चालली असल्याबद्दल प पूज्य राजनकाका देशमुख महाराज यांनी खंत व्यक्त करून तरुण पिढीने आई वडिलांचे मन दुखावू नये त्यांची आणि भगवंताची सेवा करावी तुमचे निश्चित कल्याण होईल असे आवाहन केले.
यावेळी ह भ प नवनाथ महाराज शेलार
, ह भ प धैर्यशील देशमुख महाराज, फलटण मधील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमास डॉ. भारत पोंदकुले डॉ. चंद्रकांत इनामके हेही उपस्थित होते.
कार्यक्रमात स्वामींना अभिषेक झाल्यानंतर मंत्र ,नामस्मरण कार्यक्रम झाले सायंकाळी महाआरती होऊन महाप्रसाद देण्यात आला. यावेळी हजारो भक्तगण उपस्थित होते.


