स्थानिक
फलटण येथील रविवार पेठ तालीम गणपती मंदिराचा जीर्णोद्धार लोकार्पण आणि कलशारोहन सोहळा निमित्त दि.22 ते 24 एप्रिल या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

फलटण – फलटण येथील रविवार पेठ तालीम गणपती मंदिराचा जीर्णोद्धार लोकार्पण आणि कलशारोहन सोहळा निमित्त दिनांक 22 ते 24 एप्रिल या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 22 रोजी सकाळी 11 ते 2 श्री ची मूर्ती व कलश आगमन सायंकाळी 5 ते 9 श्री ची मूर्तींची नगर प्रदक्षिणा व कलश शुभयात्रा रात्री 9 ते 10 या वेळेत दशविध स्नान व ध्यानधीवास.
गुरुवार दिनांक 23 एप्रिल रोजी दुपारी १२ ते १. ३० या वेळेत विरशैव महिला भजनी मंडळ यांचे भजन,दुपारी 4 वाजता संकल्प पुण्याहवाचन श्री व कलश यांना जलाभिषेक जलदिवास, उदक शांती मुख्य देवता स्थापन पूजन.रात्री 9 ते 11 या वेळेत माणकेश्वर भजनी मंडळ यांचे भजन. शुक्रवार दिनांक 24 रोजी सकाळी 10 वाजता मंदिर वास्तुशांती व श्रींच्या मूर्तीवरील संस्कार हवन पुर्णआहुती.दुपारी 4 वाजता मूर्ती व कलश प्रतिष्ठापना सायंकाळी 5 वाजता श्रींची महाआरती सायंकाळी 6 वाजता महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत.
मंदिराचा लोकार्पण सोहळा विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते, कलशारोहण श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट पुसेगावचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडेगुरुजी यांच्या शुभ हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे भूषविणार आहेत. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर,जिल्हा परिषद सदस्य सह्याद्री कदम,पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, फलटण नगरपालिकेची माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, माजी नगरसेवक हेमंत निंबाळकर, के बी उद्योग समूहाचे चेअरमन सचिन यादव, नगरसेवक पंकज पवार,नगरसेविका सौ कविता मदने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रविवार पेठ तालीम गणपती मंडळाचे अध्यक्ष नितीन चोरमले, उपाध्यक्ष किरण शहाणे, मार्गदर्शक मोहनराव पोतेकर यांनी केले आहे सदरचा समारंभ रविवार पेठ येथील गोविंद प्लाझा समोर होणार आहे.


