फलटण -आज सासवड ते शिखर शिंगणापूर संत शिवभक्त तेली भूतोजी महाराज यांच्या कावड यात्रेचे स्वागत फलटण जिंती नाका येथे आमदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी श्री शिव कावडीचे यथोचित पूजन करून आमदार सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते आरती करण्यात आली. फलटण तालुक्यावर शिव शंभू महादेवाचा कृपाशीर्वाद राहो अशी प्रार्थना यावेळी आमदार सचिन पाटील यांनी दर्शन घेऊन केली. यावेळी कावड प्रमुख कावड महाराज, सुनील घोलप, रणजीत काशिद व मोठ्या प्रमाणात शिवभक्त उपस्थित होते. दरम्यान ठिकठिकाणी आज कावडीचे मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आले.
Back to top button
