स्थानिक

सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख यांच्या माध्यमातून ३५० बांधकाम कामगारांना संचाचे वाटप

फलटण – बांधकाम कामगार नोंदणीचा कार्यक्रम. 20 ऑक्टोंबर .2025..रोजी सामाजिक कार्यकर्ते अमीर भाई शेख यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला होता यावेळी 350  बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली होती. नोंदणीनंतर बांधकाम कामगार यांना पेटी आणि संसार उपयोगी वस्तूचे वाटप बांधकाम कामगार लाभार्थ्यांना करण्यात आले.

यावेळी. फलटण शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ. डॉ.जे .टी पोळ. आदर्श शिक्षक उत्तमराव महामुलकर  यांच्या शुभहस्ते लाभार्थ्यांना पेटी आणि संसार उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे, भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष  अमोल सस्ते,नगरसेवक आणि पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष राहुल निंबाळकर,शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अमर आप्पा खानविलकर,गायकवाड सर, अय्याजभाई शेख, ताजुद्दीन बागवान,मंगेश बेंद्रे,मोहन पोतेकर,आरबाज शेख,राजु घनवट,दादा मरगळ, पत्रकार नसीर शिकलगार, पत्रकार राजाभाऊ बोंद्रे ‌ पत्रकार प्रशांत रणवरे. निखिल उपाध्याय,अमीर शेख उपस्थित होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख यांनी बांधकाम कामगार.आणि एस टी. महामंडळा च्या नागरिकांसाठी सुविधा मिळवून देण्यासाठी लवकरच कार्यक्रमाचे नियोजन करणार आहे असे जाहीर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button