स्थानिक

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301 वी जयंती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 353 वा राज्याभिषेक दिन गुणवरे येथे उत्साहात साजरा

फलटण– गुणवरे(आढाववस्ती) येथे पंचशील तरुण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301 वी जयंती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 353 वा राज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधत समाजाला प्रेरणा देणारा एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी हिरामण आढाव व त्यांचे चिरंजीव सुमेध आढाव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचवेळी मागील कार्यक्रमात मधील वाढदिवसानिमित्त, 

  पुणे पोलीस मनोज आढाव यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंचशील तरुण मंडळ आढावस्ती बुद्ध विहार मध्ये एक सिलिंग फॅन देऊन . समाजात एक चांगला संदेश दिला.तीच आदर्श भावना घेऊन पुढे होत. हिरामण आढाव यांनी तरुण विद्यार्थ्यांसाठी एक चांगला उपक्रम सुरू करून MPSC व UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची भेट देऊन ज्ञानदानाचा आदर्श निर्माण केला. 

तसेच पत्रकार राजू बनसोडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पंचशील तरुण मंडळाला मुलांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी पुस्तकांचा संच भेट देऊन समाजात चांगला संदेश निर्माण केला तसेच. . किरण आढाव यांनी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त पुस्तके ठेवण्यासाठी दोन हजार रुपये किमतीचा पुस्तक रॅक भेट दिला. त्याचप्रमाणे

 नानासो आढाव यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा भेट देऊन इतिहासाची प्रेरणा जपली. तसेच फलटण येथील तात्यासाहेब गायकवाड यांनी आढाववस्ती वरील व्हाट्सअप फेसबुकच्या द्वारे कार्यक्रम पाहून त्यांना पण समाजासाठी तरुण मुलांसाठी काय तरी करावे या हेतूने त्यांनी जनरल नॉलेज पुस्तकांचा संच भेट देऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीस हातभार लावला.

या सर्व दातृत्वपूर्ण योगदानामुळे वाढदिवस हा केवळ आनंदाचा दिवस न राहता समाजोपयोगी कार्याची प्रेरणा देणारा उत्सव ठरला. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी विचारांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य व जनहिताच्या आदर्शांचा वारसा जपत आढाववस्तीतील नागरिकांनी समाजसेवा, शिक्षण आणि एकतेचा सुंदर संदेश दिला.

या कार्यक्रमास आढाववस्तीतील सर्व नागरिक, युवक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्ञानदान, समाजसेवा आणि ऐतिहासिक प्रेरणा यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button