स्थानिक
प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस देणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी – नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर

फलटण – फलटण शहरातील बाहुली शाळा येथील फलटण नागरी आरोग्य केंद्रामध्ये आज नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

फलटण नगरपालिकेच्या या नागरी आरोग्य केंद्रामध्ये लहान बालकांना लसीकरण करण्यासाठी मोठा प्रतिसाद मिळाला.
प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस देणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. पोलिओमुक्त भारत घडविण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील मुलांना पोलिओचे दोन थेंब आवर्जून द्यावेत असे आवाहन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.

