स्थानिक

फलटणचा आध्यात्मिक वारसा नगरपालिका जपणार ! ‘डेक्कन चौक ते उमाजीराजे चौक रस्त्याला आता अधिकृतपणे ‘प.पु. उपळेकर महाराज पथ’ नाव देण्याचा ठराव

फलटण: — फलटण शहराच्या वैभवात आणि सांस्कृतिक इतिहासात आणखी एका सुवर्णपानाची भर पडली आहे. फलटण नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत शहराच्या आध्यात्मिक परंपरेचा गौरव करणारा एक ऐतिहासिक निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला. फलटणकरांचे श्रद्धास्थान आणि थोर संत प.पू. गोविंदकाका महाराज उपळेकर यांच्या स्मृती भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘डेक्कन चौक ते उमाजीराजे नाईक चौक’ या मुख्य मार्गाचे नामकरण आता अधिकृतपणे ‘प.पू. उपळेकर महाराज पथ’ असे करण्याला मंजुरी देण्यात आली.

या कौतुकास्पद नामांतराची सुरुवात विजय उपळेकर यांनी नगरपरिषदेकडे सादर केलेल्या प्रस्तावाने झाली.त्यावर विचार विनिमय करून नगरपालिका सभेत मांडण्यात आलेला ठरावाला नगरपरिषदेच्या नियोजन व विकास समितीचे सभापती संदीप चोरमले हे या ठरावाला सूचक होते तर अनुमोदक नगरसेवक अमित भोईटे हे होते 

सभेत या प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली आणि सर्वपक्षीय सदस्यांनी संत उपळेकर महाराजांचे समाजकार्य आणि आध्यात्मिक योगदान लक्षात घेऊन या ठरावाला एकमताने मंजुरी दिली.

🩺 ‘वैद्यकीय व्यवसाय ते अध्यात्म’: महाराजांचे अद्वितीय योगदान

संत प.पू. गोविंदकाका महाराज उपळेकर यांनी केवळ अध्यात्माचा प्रसार केला नाही, तर समाजसेवेचा एक नवा आदर्श घालून दिला. आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळत त्यांनी जनसामान्यांचे दुःख दूर केले आणि सोप्या भाषेत अध्यात्माचे महत्व सांगून हजारो भक्तांना योग्य सन्मार्ग दाखवला. त्यांच्या याच निस्वार्थी कार्याला मानवंदना देण्यासाठी नगरपरिषदेने हा निर्णय घेतला आहे.

💬 “हा निर्णय इतिहासात मैलाचा दगड ठरेल” – नगराध्यक्ष

या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करताना नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की “फलटणला खूप मोठा आणि समृद्ध आध्यात्मिक वारसा लाभला आहे. संत उपळेकर महाराजांचे विचार आणि कार्य आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. या मार्गाच्या नामकरणामुळे शहरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आणि विशेषतः तरुण पिढीला महाराजांच्या महान कार्याची माहिती मिळत राहील. फलटणच्या सांस्कृतिक इतिहासात हा निर्णय मैलाचा दगड ठरेल.”

आता फलटणच्या या मुख्य रस्त्यावरून जाताना प्रत्येक नागरिकाला महाराजांच्या आध्यात्मिक ऊर्जेची आणि सामाजिक कार्याची आठवण येत राहील अशा भावना संदीप चोरमले आणि अमित भोईटे यांनी व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button