स्थानिक

आयडियल इंटरनॅशनल स्कूल, फलटणतर्फे दि. ११ रोजी आयडियल वारीचे आयोजन – डॉ.सौं वैशाली शिंदे

 फलटण – आयडियल इंटरनॅशनल स्कूल, फलटण तर्फे सर्व विद्यार्थी वृंद व पालक यांच्या कडून दिनांक 11 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक 8.30 वाजता ज्ञानेश्वर महाराज मंदिर डेक्कन चौक, फलटण येथे भव्य दिंडी सोहळा तसेच नाट्य व नृत्य स्वरूपात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयडियलच्या प्राचार्या डॉ. सौ वैशाली शिंदे यांनी दिली 

 संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आळंदीहून प्रस्थान झाले आहे आता सर्वांना पंढरीच्या वारीची ओढ लागलेली आहे..‘पंढरीची वारी-करी वारकरी उन्ह पावसाची चिंता कोण करी’ असे म्हणत लाखो विठ्ठल भक्त वारकरी किंवा लोक पंढरपूरला प्रस्थान करणार आहेत..आपलं फलटणकरांचे भाग्य म्हणजे संत श्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आपल्या फलटणमध्ये मुक्काम करते आणि त्यावेळेस सर्व वातावरण भक्तिमय होऊन जाते..

या वारीचे औचित्य साधून आयडियल इंटरनॅशनल स्कूल, फलटण तर्फे सर्व विद्यार्थी वृंद व पालक यांच्या कडून दिनांक 11 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक 8.30 वाजता ज्ञानेश्वर महाराज मंदिर डेक्कन चौक, फलटण येथे भव्य दिंडी सोहळा तसेच नाट्य व नृत्य स्वरूपात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आपण सर्व फलटणकरांनी उपस्थित राहून या भक्तिमय कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा व आमच्या वारीमध्ये सहभागी होऊन आमचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन डॉ वैशाली शिंदे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button