फलटण – येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौकात गेल्या महिनाभरापासून नगरपालिकेची ड्रेनेज लाईन चोकअप झाल्याने रस्त्यावर आणि थेट संत सावता महाराज मंदिरामध्ये दुर्गंधीयुक्त घाण पाणी साचत आहे.

येत्या ५ ऑगस्टपासून श्री संत सावता महाराज मंदिराचा पुण्यतिथी सप्ताह सोहळा सुरू होत असतानाच, या गंभीर समस्येकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
भर वरदळीचे ठिकाण असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील चौकामध्ये साचलेल्या दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून अनेकांच्या अंगावर हे घाण पाणी उडत आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना प्रवाशांना घाण कुबटवासाचा सामना करावा लागत आहे. मंदिर परिसरात सुद्धा दुर्गंधी पसरत चालली आहे. त्यामुळे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
५ ऑगस्ट २०२६ पासून श्री संत सावता महाराज यांचा पुण्यतिथी सप्ताह सुरू होत असल्याने भाविकांची मोठी गर्दी होणार आहे, परंतु मंदिरातच घाण पाणी शिरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
श्री सावता महाराज मंदिर ट्रस्टचे विश्वस्त विजय नेवसे यांनी फलटण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांना अधिकृत अर्ज देऊन ही तुंबलेली ड्रेनेज लाईन तात्काळ दुरुस्त करण्याची आग्रही मागणी केली आहे.
Back to top button
