स्थानिक

बुध.दि. २९ रोजी गुरु पौर्णिमा दिनानिमित्त प. पू . राजनकाका देशमुख महाराज यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन 

  फलटण – श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, बुधवार पेठ,शिवाजी रोड फलटणच्यावतीने प. पु .राजनकाका देशमुख महाराज यांच्या उपस्थितीत दि २९ रोजी गुरु पौर्णिमा दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन दिवसभर नवलबाई मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे.

दि २९ रोजी सकाळी ८ वाजता नवलबाई मंगल कार्यालय फलटण येथे आयोजित कार्यक्रमात स्वामींना अभिषेक झाल्यानंतर मंत्र ,नामस्मरण कार्यक्रम होणार असून सायंकाळी महाआरती होऊन महाप्रसाद देण्यात येणार आहे .यावेळी प पू राजनकाका देशमुखमहाराज यांचे धार्मिक प्रवचन होणार आहे. यावेळी ह.भ. प. नवनाथ शेलार महाराज आणि ह. भ.प.धैर्यशील देशमुख महाराज उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमातच रक्षक रयतेचा न्युज तर्फे गुरु पौर्णिमेनिमित्त परमपूज्य राजन काका देशमुख महाराज यांच्यावर आधारित विशेष अंकाचे प्रकाशन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत  करण्यात येणार आहे.या धार्मिक कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, बुधवार पेठ,शिवाजी रोड फलटणच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button