स्थानिक

फलटणमध्ये श्री संत शिरोमणी सावता महाराज ८४ वा समाधी सोहळा सप्ताहाचे आयोजन; ५ ऑगस्टपासून विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल!

फलटण :– येथील एस.टी. स्टँड जवळ असलेल्या श्री संत सावता महाराज मंदिरात श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या ८४ व्या समाधी सोहळा सप्ताहाचे दिनांक ५ ऑगस्ट पासून भव्य आयोजन करण्यात आले आहे.

 बुधवार, दिनांक ५ ऑगस्ट २०२६ ते बुधवार, दिनांक १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात पार पडणार आहे.

पंचक्रोशीतील सर्व भाविक, माता-भगिनी आणि वारकरी भक्तांनी या धार्मिक पर्वाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संत सावता महाराज मंदिर ट्रस्ट, फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

📌 सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत.

पहाटे ४ ते ६ : काकडा भजन

सकाळी ९ ते ११ : गाथा भजन

सकाळी ११ ते ४.३० : महिला भजनी मंडळ कार्यक्रम

सायंकाळी ६ ते ७ : हरिपाठ

सायंकाळी ५ ते ६ : प्रवचन

रात्री ७ ते ९ : संकीर्तन, संगीत व भजन / कीर्तन

रात्री १० ते १२ : भजनी मंडळ कार्यक्रम

🌟 विशेष आकर्षण व मुख्य कार्यक्रम :

दिंडी व मिरवणूक : मंगळवार, दिनांक ११ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पादुका व प्रतिमेची रथातून वारकरी सांप्रदाय दिंडी सोहळ्यासह भव्य मिरवणूक निघणार आहे.

काल्याचे कीर्तन : बुधवार, दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. आदिनाथ महाराज फयाळ (माजलगाव) यांचे काल्याचे कीर्तन होईल.

महाप्रसाद : मंगळवार, ११ ऑगस्ट रोजी दुपारी २.०० वाजेपासून रात्री ८.०० वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप केले जाईल.

 सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन मुनिश माधवराव जाधव, संयोजक दादासाहेब आप्पाजी शेंडे, समस्त विश्वस्त व सभासद, श्री संत सावता महाराज मंदिर ट्रस्ट, फलटण यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button