स्थानिक

फलटण शहरातील खड्ड्यांविरोधात राष्ट्रीय काँग्रेस आक्रमक; रस्ते तातडीने न दुरुस्त केल्यास तीव्र आंदोलनाचा मुख्याधिकाऱ्यांना इशारा

फलटण –फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांची झालेली भीषण दुरावस्था आणि खड्ड्यांमुळे नागरिकांचे होणारे बेहाल याविरोधात  फलटण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नगर परिषदेवर धडक देत आक्रमक भूमिका घेण्यात आली. शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, या मुख्य मागणीचे निवेदन फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांना सादर करण्यात आले.

​शहरातील मुख्य रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, अनेक  रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे  वाहनधारकांना पाठीचे आजार जडले आहेत. रोज लहान-मोठे अपघात घडत असून, निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात सापडला आहे. नगर परिषद प्रशासन या गंभीर समस्येकडे डोळेझाक करत असल्याचा थेट आरोप यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. “रस्त्यांची दुरवस्था त्वरित सुधारली नाही, तर काँग्रेस पक्ष आपल्या शैलीत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल,” असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

​याप्रसंगी फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), फलटण नगर परिषदेचे नगरसेवक पंकज पवार, फलटण शहर अल्पसंख्याक अध्यक्ष अल्ताफ पठाण, मनोहर गायकवाड, लक्ष्मण तात्या शिंदे, मंजेखान मेटकरी व गंगाराम रणदिवे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​निवेदन स्वीकारल्यानंतर मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, प्रशासन केवळ आश्वासने देणार की प्रत्यक्षात काम सुरू करणार, याकडे आता संपूर्ण फलटणकरांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button