स्थानिक

श्री.संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांच्या ७३१ व्या पुण्यतिथी निमित्त आ. सचिन पाटील यांच्या हस्ते रथाचे पूजन आणि मिरवणूकीस प्रारंभ

फलटण — आज श्री.संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांच्या ७३१ व्या पुण्यतिथी निमित्त आ. सचिन पाटील यांनी नाना पाटील चौक, फलटण येथील मंदिरात दर्शन घेऊन विनम्र अभिवादन केले.

संत सावता माळी महाराज यांच्या बद्दल बोलताना संत नामदेव महाराज म्हणतात धन्य ते अरण, रत्नाची खाण ! जन्मला निधान सावता तो !! सावता सागर, प्रेमाचा आगर ! घेतला अवतार माळ्या घरी !! संत शिरोमणी सावता महाराज यांनी आपल्या अभंगातून समाजातील अनिष्ट रूढी परंपरा तसेच जातीयवाद, अंधश्रद्धा व भक्तीचे रूप समाजात निर्माण केले आहे. प्रपंचात व शेतीच्या कामात राहून विठ्ठलभक्ती करून कर्म हीच ईश्वर सेवा आहे असा संदेश देणारे श्री.संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित गतवर्षी प्रमाणे या वर्षी देखील फलटण शहरात महाराजांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा रथाची प्रदक्षिणा पारंपरिक वाद्यच्या गजरात दर्शनासाठी आयोजित केली जाते. आज याच सोहळ्यानिमित्त श्री.संत सावता महाराज रथाचे पूजन करून शुभारंभ आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले या रथाचे व महाराजांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा. या कार्यक्रमासाठी संत सावतामाळी मंदिर ट्रस्ट चे चेअरमन मनीष जाधव, बाळासाहेब ननवरे, गोविंद भुजबळ,विकास शिंदे, बापूराव शिंदे, कुदळे, रणजित भुजबळ, सुभाष ननवरे, विक्रम शिंदे यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते. रथाची शहरातून मिरवणूक काढण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button