स्थानिक
फलटणच्या विकासाला ‘हायवे स्पीड’; नितीन गडकरींकडून ९७ कोटींचा निधी मंजूर
माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (१४ मे) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाची (NH-965) बसने प्रवास करत सविस्तर पाहणी केली. फलटण येथील सुरवडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी फलटण शहरासह संपूर्ण परिसरासाठी अनेक महत्त्वाच्या विकासकामांची घोषणा केली.
#फलटण शहरासाठी ९७ कोटींचा ‘वन टाइम इम्प्रूव्हमेंट’ प्लॅन
या दौऱ्याचे सर्वात मोठे यश म्हणजे फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी मंजूर झालेला ९७ कोटी रुपयांचा निधी. ‘वन टाइम इम्प्रूव्हमेंट’ तत्त्वावर शहरातील रस्ते चकाचक केले जाणार आहेत. यामुळे शहरातील अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत होईल.
#राव रामोशी पुलाचे रुंदीकरण
शहरातील वाहतुकीसाठी अडथळा ठरणाऱ्या राव रामोशी पुलाचे रुंदीकरण करण्याची घोषणा गडकरींनी केली. यामुळे पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.या दौऱ्यामुळे फलटण शहर आणि परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे.
“मी कामाच्या दर्जाबाबत कडक आहे. रस्ता हा दर्जेदारच झाला पाहिजे. फलटणच्या विकासासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे प्रकल्प मार्गी लागत आहेत.”
— नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री


