स्थानिक

‘रक्षक रयतेचा न्यूजच्या सडेतोड,धडक वृत्ताची दखल ; निकृष्ट पथदिव्यां विरोधात पालिका आक्रमक, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे संबंधित ठेकेदारांवर कडक कायदेशीर कारवाईचे आणि पुन्हा नव्याने काँक्रीट पायाचे मजबूत काम करण्याचे कडक आदेश

संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची नगरपालिकेची मागणी, रक्षक रयतेचा न्यूजचे सर्वत्र कौतुक

फलटण:– फलटण शहरात पालखी मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) सुरू असलेल्या पथदिव्यांच्या कामातील भीषण भ्रष्टाचाराचा पोलखोल रक्षक रयतेचा न्यूजने करताच संपूर्ण प्रशासनात खळबळ उडाली आहे. निकृष्ट दर्जाचा पोल कोसळून शेतकरी गंभीर दुखापतग्रस्त होणे आणि एसटी स्टँडसमोर विजेच्या धक्क्याने मुक्या प्राण्याचा मृत्यू होण्याच्या गंभीर घटना उघडकीस आणल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

या वृत्ताची तातडीने व अतिशय गांभीर्याने दखल घेत लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी PWD(विद्युत )विभागाला कठोर शब्दांत सुनावत कारवाईचा बडगा उगारला आहे.

🚨 नगराध्यक्ष व पालिकेचा थेट PWD{विद्युत विभाग)व ठेकेदाराला इशारा:

 पालखी मार्गावरील सर्व पथदिव्यांचे कॉंक्रिट पाया (Foundation) तांत्रिक निकषांनुसार अत्यंत दर्जेदार आणि सुरक्षित रीतीने पुन्हा करून द्यावे.

हस्तांतरणास स्पष्ट नकार:-  सर्व पथदिवे सुरक्षित व तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचा लेखी अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्याशिवाय फलटण नगरपालिका हे पथदिवे कदापि हस्तांतरित (Handover) करून घेणार नाही.

ठेकेदारावर BNS अंतर्गत गुन्हा दाखल करा:–  संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आल्याने त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांनी PWD{ विद्युत विभाग} सातारा यांच्याकडे केली आहे.

चौकशी आणि २४ तासांचा अल्टीमेटम:- संपूर्ण प्रकरणाची सार्वजनिक बांधकाम विभागाने सखोल चौकशी करावी आणि २४ तासांच्या आत सुरक्षेशी संबंधित तांत्रिक अहवाल पालिकेकडे सादर करावा, अन्यथा भविष्यातील सर्व दुर्घटनेची जबाबदारी PWD {विद्युत विभाग}चीच राहील.

 दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय देशपांडे यांनी सुद्धा या निकृष्ट कामाची कडक दखल घेत  बांधकाम विभाग विद्युत विभाग, सातारा यांना दर्जेदार कामे करण्याची व सर्व कामांची पूर्ण तपासणी करण्याचे लेखी पत्राद्वारे कळविले आहे. 

‘रक्षक रयतेचा न्यूज’चा दणका!

“नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या भ्रष्ट ठेकेदारांची गय केली जाणार नाही.” ‘रक्षक रयतेचा न्यूज’ने लावून धरलेल्या या धडक बातम्यांमुळे अखेर प्रशासनाला जाग आली असून, आता भ्रष्ट ठेकेदाराचे धाबे दणाणले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button