स्थानिक

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात अनेकांनी शिक्षकांना जुंपले, शिक्षकांमध्ये नाराजी, निवडणूक आयोगाचे दुर्लक्ष

फलटण {नसीर शिकलगार }- फलटण तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक शिक्षक राजकीय सभांमध्ये तसेच पदयात्रामध्ये नेते मंडळींच्या दबाव पोटी भाग घेत असून निवडणूक आयोग मात्र आंधळेपणाचे ढोंग घेत आहे.

 फलटण तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा धुरळा उडाला असून गर्दी जमवण्यासाठी तसेच मतदारांच्या गाठीभेठी घेण्यासाठी नेतेमंडळी धडपडत असताना सर्वच पक्षातील अनेक नेते मंडळींनी स्वतःच्या संस्थेमधील शिक्षकांना प्रचाराला झुंपले आहे. अनेक शिक्षक उघडपणे विविध प्रचार सभेत तसेच पदयात्रा, थेट मतदारांच्या गाठीभेटी मध्ये नेते मंडळी बरोबर दिसत आहे.शिक्षकांना या गोष्टी पटत नाही मात्र दबावापोटी ते फिरत असून शिक्षकांमध्ये त्याबद्दल नाराजी आहे. 

काही शिक्षकांना प्रचारात सहभागी होण्यासाठी तसेच मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी प्रचार करण्याचे,गाठीभेटी घेण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. काही जणांनी तर चक्क शिक्षकांकडून निधी गोळा केला आहे. त्यामुळे शिक्षक वर्ग भीतीपोटी गप्प बसून आहे. यावर उघडपणे बोलायला कोणी तयार होईनासा झाला आहे.

 प्रत्येक प्रचार सभांना निवडणूक आयोगाची लोक फिरत असतात मात्र शिक्षक फिरत असताना कसलीच कारवाई होताना दिसत नाही. राजकीय दबावापोटी निवडणूक आयोग गप्प बसून आहे का असा प्रश्न मतदारांकडून विचारला जात आहे शिक्षणाचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांवर दारोदारी फिरण्याची नामुष्की टाळण्याची मागणी मतदारांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button