स्थानिक
नागरिकांनी शासनाच्या विविध योजनाचा लाभ घ्यावा – आ. सचिन पाटील

फलटण – नागरिकांनी शासनाच्या विविध योजनाचा लाभ घ्यावा तसेच शासन दरबारी असलेली प्रलंबित कामे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून करून घ्यावीत असे आवाहन आ. सचिन पाटील यांनी केले.
आज तालुकास्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्र.१ सजाई गार्डन मंगल कार्यालय, फलटण येथे आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी आमदार सचिन पाटील म्हणाले तालुक्यातील जनतेच्या सहकार्यामुळे मी आज लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत आहे आणी याच माध्यमातून लोकांची सेवा करण्याचे भाग्य मला लाभत असून जनतेने दिलेल्या आशिर्वादामुळेच मी शासनाच्या विविध योजना आपल्या दारी आणू शकलो. नागरिकांनी शासनाच्या विविध योजनाचा लाभ घ्यावा तसेच शासन दरबारी असलेली प्रलंबित कामे या अभियानाच्या माध्यमातून करून घ्यावीत तसेच अधिकारी वर्गाने देखील नागरिकांना सहकार्य करावे.

