स्थानिक
बिनडोक कॉन्ट्रॅक्टरने फलटण ते कोळकी रस्त्यावरील पुलांची उंची न वाढविता सुरु केले रस्त्याचे काम, पावसाळ्यात पुन्हा पुलावरून पाणी जाऊन रस्ता बंद होण्याची भीती
लोकप्रतिनिधींनी तातडीने रस्त्याचे काम थांबवून पुलांची उंची वाढवण्याचे द्यावे आदेश, नागरिकांची मागणी
फलटण{नसीर शिकलगार }- फलटण ते दहिवडी (NH 160) रस्ता चौपदरीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी फलटण ते कोळकी रस्त्यावरील पुलांची संबंधित कॉन्ट्रॅक्टरने उंची न वाढविल्याने हे काम तातडीने थांबवून पुलाची उंची वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
फलटण ते दहिवडी (Package 1) अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग १६० चे रुंदीकरण व उन्नतीकरण काम वेगाने सुरू आहे हा संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रीटचा होणार आहे. सदरचा रस्ता करताना जुना रस्ता पूर्णपणे खोदून त्यावर नवीन रस्ता करायचा आहे तसेच रुंदीकरण पण करायचे आहे. हे सर्व करीत असताना रस्त्यावर येणाऱ्या सर्व पुलांचे नवीन काम करायचे आहे. फलटण शहरानजीक कोळकी गाव असून फलटण ते कोळकी रस्त्यावर 24 तास मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते या रस्त्यावर दोन पूल असून पावसाळ्यात पुलाच्या आजूबाजूने अतिक्रमण झाल्यामुळे पुलावरून पाणी वाहत असते अनेकांच्या घरात यामुळे पाणी शिरते त्यामुळे या पुलांची किमान तीन ते चार फुटाणे उंची वाढविणे गरजेचे आहे.



