स्थानिक

फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून धन्यकुमार गोडसे यांची नियुक्ती, यापूर्वी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे होते पोलीस निरीक्षक

फलटण-  फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व सध्या स्वारगेट येथे स्वारगेट विभागात सहाय्यक पोलीस आयुक्त असलेले धन्यकुमार गोडसे यांची फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून निवड झाली आहे.

 धन्यकुमार गोडसे हे जनतेत लोकप्रिय असलेले पोलीस अधिकारी असून फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे कार्यरत असतानाच त्यांना पदोन्नती मिळाली होती नाशिक ग्रामीण येथे त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम केले त्यानंतर  त्यांनी पुणे येथे वानवडी विभागाचे त्यानंतर स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून प्रभावीपणे काम केले आहे . काल झालेल्या प्रशासकीय बदल्यात त्यांची फलटण येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून फलटणला कार्यक्षम अधिकारी मिळाल्याने फलटण उपविभागात गुन्हेगारीला चाप बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.येत्या २ ते ३  दिवसात ते फलटणचा चार्ज घेणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button