स्थानिक

कर घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे आपले पैसे तर खाल्ले नाही ना याची नागरिकांना चिंता, भ्रष्ट कर्मचाऱ्यांबाबत सोमवारी होणार अंतिम निर्णय

नागरिकांनी पावत्या तपासून घेण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन, मुख्याधिकाऱ्यांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही

भाग २

फलटण – फलटण नगरपालिकेतील कोट्यवधींच्या कर घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे आपले पैसे तर खाल्ले नाही ना याची नागरिकांना चिंता लागून राहिली आहे.भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी अत्यंत आक्रमक आणि कडक पवित्रा घेतला आहे.सोमवारी भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी माफीनामा सादर करावा आणि खाल्लेली रक्कम जमा करावी अन्यथा थेट कायदेशीर कारवाईला सामोरे जावा असा इशारा नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.

नगरपालिकेची ज्यांच्याकडे जवाबदारी आहे त्या मुख्याधिकारी यांनी अद्याप आपली भुमिका स्पष्ट केली नसल्याने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे. एवढा मोठा घोटाळा झालास कसा असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. वसुली विभागाप्रमाणे इतर विभागात सुद्धा भ्रष्टाचाराची मोठी साखळी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे 

 नगरपालिकेच्या वसुली विभागात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला मोठा कर घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. मालमत्ता कर, घरपट्टी आणि पाणीपट्टीची रक्कम रोख स्वरूपात गोळा करून ती पालिकेच्या खात्यात जमा न करता थेट स्वतःच्या खिशात घालण्याचा धक्कादायक प्रकार काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणावरून फलटण शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या ‘महानेट’ सॉफ्टवेअरचा गैरवापर करून, थकबाकी कमी दाखवून किंवा बोगस पावत्या देऊन नागरिकांची फसवणूक केली. चौकशी समितीसमोर काही कर्मचाऱ्यांनी सॉफ्टवेअरमधून पावत्या डिलीट करून पैसे लाटल्याची धक्कादायक लेखी कबुली दिली आहे.

 मालमत्ता हस्तांतरण, नवीन नोंदणी किंवा भाडेकरूंची नोंद कमी करण्यासाठी ५०० ते २००० रुपयांपर्यंत लाच घेतली जात असल्याचा प्रकारही एका कर्मचाऱ्याच्या जबाबातून समोर आला आहे.

 पालिकेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ जागेवर (ऑर्डरप्रमाणे) तात्काळ हजर राहून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

“माफीनामा सादर करा, नाहीतर थेट जेलची हवा खा!”फलटण नगरपालिकेतील कोट्यवधींच्या कर घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असून, भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी अत्यंत आक्रमक आणि कडक पवित्रा घेतला आहे.सोमवारी भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी माफीनामा सादर करावा आणि खाल्लेली रक्कम जमा करावी अन्यथा थेट कायदेशीर कारवाईला सामोरे जावा असा इशारा नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.

नगरपालिकेची ज्यांच्याकडे जवाबदारी आहे त्या मुख्याधिकारी यांनी अद्याप आपली भुमिका स्पष्ट केली नसल्याने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे. एवढा मोठा घोटाळा झालास कसा असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. वसुली विभागाप्रमाणे इतर विभागात सुद्धा भ्रष्टाचाराची मोठी साखळी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे 

 नगरपालिकेच्या वसुली विभागात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला मोठा कर घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. मालमत्ता कर, घरपट्टी आणि पाणीपट्टीची रक्कम रोख स्वरूपात गोळा करून ती पालिकेच्या खात्यात जमा न करता थेट स्वतःच्या खिशात घालण्याचा धक्कादायक प्रकार काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणावरून फलटण शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या ‘महानेट’ सॉफ्टवेअरचा गैरवापर करून, थकबाकी कमी दाखवून किंवा बोगस पावत्या देऊन नागरिकांची फसवणूक केली. चौकशी समितीसमोर काही कर्मचाऱ्यांनी सॉफ्टवेअरमधून पावत्या डिलीट करून पैसे लाटल्याची धक्कादायक लेखी कबुली दिली आहे.

 मालमत्ता हस्तांतरण, नवीन नोंदणी किंवा भाडेकरूंची नोंद कमी करण्यासाठी ५०० ते २००० रुपयांपर्यंत लाच घेतली जात असल्याचा प्रकारही एका कर्मचाऱ्याच्या जबाबातून समोर आला आहे.

 पालिकेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ जागेवर (ऑर्डरप्रमाणे) तात्काळ हजर राहून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

“माफीनामा सादर करा, नाहीतर थेट जेलची हवा खा!”

दोषी कर्मचाऱ्यांनी तात्काळ माफीनामा सादर करावा आणि भ्रष्टाचारातून कमावलेली संपूर्ण रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा करावी; अन्यथा त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम नगराध्यक्षांनी दिला आहे.

 या संपूर्ण घोटाळ्याप्रकरणी आणि दोषी कर्मचाऱ्यांच्या भवितव्याबाबत सोमवार दिनांक १२ रोजी नगराध्यक्ष अंतिम व ठोस निर्णय घेणार आहेत.

नगराध्यक्षांनी फलटणच्या जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे:

नागरिकांनी कर भरलेल्या आपल्या सर्व पावत्या पुन्हा एकदा नगरपालिकेत येऊन तपासून (चेक करून) घ्याव्यात.

कर भरूनही जर रेकॉर्डला थकबाकी दिसत असेल किंवा यासंदर्भात कोणाची काहीही तक्रार असल्यास, त्यांनी थेट पालिकेकडे लेखी तक्रारी दाखल कराव्यात.

“फलटणच्या जनतेचा पैसा शहराच्या विकासासाठीच वापरला गेला पाहिजे, भ्रष्टाचाऱ्यांच्या खिशात नाही! दोषींवर निलंबनाची आणि फौजदारी कारवाई केल्याशिवाय पालिका शांत बसणार नाही.”

— समशेरसिंह नाईक निंबाळकर (नगराध्यक्ष, फलटण)

दोषी कर्मचाऱ्यांनी तात्काळ माफीनामा सादर करावा आणि भ्रष्टाचारातून कमावलेली संपूर्ण रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा करावी; अन्यथा त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम नगराध्यक्षांनी दिला आहे.

 या संपूर्ण घोटाळ्याप्रकरणी आणि दोषी कर्मचाऱ्यांच्या भवितव्याबाबत सोमवार दिनांक १२ रोजी नगराध्यक्ष अंतिम व ठोस निर्णय घेणार आहेत.

नगराध्यक्षांनी फलटणच्या जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले असून नागरिकांनी कर भरलेल्या आपल्या सर्व पावत्या पुन्हा एकदा नगरपालिकेत येऊन तपासून (चेक करून) घ्याव्यात.

कर भरूनही जर रेकॉर्डला थकबाकी दिसत असेल किंवा यासंदर्भात कोणाची काहीही तक्रार असल्यास, त्यांनी थेट पालिकेकडे लेखी तक्रारी दाखल कराव्यात.”फलटणच्या जनतेचा पैसा शहराच्या विकासासाठीच वापरला गेला पाहिजे, भ्रष्टाचाऱ्यांच्या खिशात नाही! दोषींवर निलंबनाची आणि फौजदारी कारवाई केल्याशिवाय पालिका शांत बसणार नाही.”

— समशेरसिंह नाईक निंबाळकर (नगराध्यक्ष, फलटण)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button