स्थानिक

फलटण तालुक्यातील खरीपाच्या पिकांसाठी क्लाउड सिडिंग कृत्रिम पाऊसाचा प्रयोग करा: अनिलकुमार कदम 

फलटण –फलटण,माण खटाव खंडाळा कोरेगाव तालुक्यातील खरीप हंगामातील बाजरी तूर उडीद मूग मटकी चवळी मका पावटा घेवडा वाटाणा अशा विविध पिकांची मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी उसनवारी व खाजगी कर्ज काढून शेती मशागत करून पेरणी केली आहे,अशातच पावसाने उघडीप दिल्याने दुबार पेरणीचे संकट आ वासून उभे राहिले आहे.यावर तातडीने शासनाने कृत्रिम पाऊसाचा प्रयोग करावा अन्यथा शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता आहे.अशी मागणी महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी केली आहे.

फलटण माण खटाव खंडाळा कोरेगाव तालुक्यातील खरीप हंगामातील पिके वाचविण्यासाठी शासनाने कृत्रिम पाऊसाचा प्रयोग तातडीने करावा.यासाठी जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी यांनी संयुक्तपणे शासनाकडे विनाविलंब तातडीने कृत्रिम पाऊसाचा प्रयोग करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा.यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी पुढाकार घ्यावा अशी कळकळीची विनंती महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी केली आहे.

यंदा पावसाचे संकट निर्माण झाले आहे तरी खरीप हंगामातील पिके हि एका पावसाच्या भरवशावर हातातोंडाशी येतील व तो पर्यंत एकदा पाऊस होईल.जिराईत रानवडी क्षेत्रातील खरीप हंगामातील पिके वाचविण्यासाठी शासनाने कृत्रिम पाऊसाचा प्रयोग आठवड्यात तातडीने केला तर दुबार पेरणीचे संकट दूर होईल.अन्यथा खरीपाची पिक पावसा अभावी हातची जाण्याची शक्यता आहे.यावर्षीच्या सुरवातीला खरीप हंगामातील पिके पावसा अभावी हातची गेली तर दूबार पेरणी शेतकरी आर्थिक संकटात आल्यावर करु शकत नाही.खरीपाची उसनवारी व खाजगी कर्ज कसे फेडावे या चिंतेने शेतकरी ग्रासला आहे.

आता तातडीने पावसाचे पाण्याचे ढग दाटून येतात पण पाऊस पडत नाही.हिच वेळ आहे कृत्रिम पाऊसाचा प्रयोग करण्याची.हि सोनेरी वेळ निघून गेल्यावर परत कृत्रिम पाऊसाचा प्रयोग करुन काही उपयोग होणार नाही.

तरी फलटण माण खटाव खंडाळा कोरेगाव तालुक्यातील खरीप हंगामातील पिके वाचविण्यासाठी शासनाने, जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी गंभीरपणे विचार करुन तातडीने कृत्रिम पाऊसाचा प्रयोग करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करावेत.अशी विनंती अनिलकुमार कदम यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button