फलटण — फलटण शहर व तालुक्यातील विविध विकास कामासंदर्भात महत्त्वाची आढावा बैठक सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख अधिकारी वर्गासह माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. फलटण दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार ही बैठक प्रशासनाने आयोजित केली होती.

फलटण शहर आणि संपूर्ण तालुक्यामध्ये होत असलेल्या विविध विकासकामे जसे नाईकबोमवाडी येथील नवीन औद्योगिक वसाहतीला लार्ज मेगा प्रोजेक्ट दर्जा देऊन त्या अनुषंगाने जमिनी अधिग्रहण करणे, शालेय मुलांचा विचार करता सर्व सोयींनी सुसज्ज असे क्रीडा संकुल बांधणे, नवीन क्रीडा संकुल आणि RTO कार्यालय बांधकामा करिता जमीन हस्तांतरित करणे आणि अन्य विषयांच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.
या प्रसंगी आ. सचिन पाटील,माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर , जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील, अतिरिक्त जिल्हा परिषद मुख्याधिकारी सिद्ध साहेब, फलटण प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ.अभिजित जाधव, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, शिवरूपराजे खर्डेकर, युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर व विविध विभागाचे सर्व स्तरावरील अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
फलटण तालुक्यात राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर झाली आहेत. या कामा संदर्भात जिल्हा प्रशासनाने बैठक घ्यावी असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण दौऱ्यात दिले होते त्याप्रमाणे आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत सर्व कामांचा आढावा घेण्यात आला आणि विकास कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले.
Back to top button
