फलटण:—भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ८० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून फलटण तालुक्यातील विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 ऑगस्ट रोजी महारक्तदान शिबीर, निसर्ग रक्षण व संवर्धन प्रभातफेरी तसेच चायनीज मांजा जनजागृती चित्रफित प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, १५ ऑगस्ट व रविवार, १६ ऑगस्ट २०२६ सकाळी ९:०० ते सायंकाळी ८:०० वाजेपर्यंत मुधोजी क्लब ग्राउंड, महात्मा फुले चौक, फलटण येथे रक्तदान शिबिर होणार असून दिनांक 15 रोजी सकाळी ८ वाजता रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात येणार आहे
रविवार, १६ ऑगस्ट २०२६ सकाळी ९:०० वाजता मुधोजी क्लब मैदान येथून निसर्ग जनजागृती फेरी काढण्यात येणार आहे यावेळी घातक चायनीज मांजाबाबत जनजागृती करणारी विशेष चित्रफित दाखवली जाणार आहे.
सहयोग सोशल फाउंडेशन,रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन फलटण,नेचर अँड वाइल्डलाइफ वेल्फेअर सोसायटी,क्रांतीसूर्य प्रतिष्ठान,महात्मा शिक्षण संस्था,निसर्ग रक्षण व संवर्धन संस्था, फलटणयांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व नागरिकांनी या सामाजिक व राष्ट्रीय कार्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करावे आणि प्रभातफेरीस उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.