स्थानिक

थेट भारत सरकारची निवड; तनमन राजेंद्र बर्डे यांचा भोपाळ विधानसभेत आवाज!,राष्ट्रीय युवा संसदेत महाराष्ट्राची बाजू मांडत तरुण वक्त्याची दमदार कामगिरी

फलटण – भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय युवा संसदेसाठी महाराष्ट्रातील तनमन राजेंद्र बारडे यांची थेट निवड झाली. भोपाळ येथील मध्यप्रदेश विधानसभेत आयोजित कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत प्रभावी भाषण केले.

देशभरातून निवडक युवा प्रतिनिधी या उपक्रमासाठी सहभागी झाले होते. या राष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राकडून प्रतिनिधित्व करण्याचा मान तनमन बारडे यांना मिळाला.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या उपस्थितीत विधानसभेच्या सभागृहात झालेल्या संसदीय चर्चेत बारडे यांनी आत्मविश्वासाने आपली भूमिका मांडली. मुख्यमंत्री डॉ. यादव यांनी युवा प्रतिनिधींशी संवाद साधत त्यांच्या सहभागाचे कौतुक केले.

याच कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी युवकांशी संवाद साधला.

राष्ट्रीय स्तरावरील या अनुभवामुळे महाराष्ट्रातील युवा नेतृत्वाला नवी दिशा मिळत असल्याची भावना व्यक्त होत असून, तनमन बारडे यांच्या या कामगिरीचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button