बारामती : लातूर सायन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत मेहनत, गुणवत्ता आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर उत्कृष्ट यश मिळवलं आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामुळे पालक, शिक्षक आणि शिक्षणप्रेमींमधून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

यंदा अकॅडमीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या दैदिप्यमान कामगिरीमुळे अकॅडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
॰ दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
अकॅडमीचा विद्यार्थी संस्कार सचिन भोजने यांनी ९८.८०% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे गणित विषयात १००/१०० गुण मिळवत त्यांनी सर्वांगीण गुणवत्ता सिद्ध केली आहे
तसेच वैष्णवी सचिन कारंडे यांनी ९७.२०% गुणांसह उल्लेखनीय यश संपादन केले असून इतर अनेक विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट गुण मिळवत अकॅडमीच्या यशात मोलाची भर घातली आहे.त्याचबरोबर बारावीच्या विद्यार्थ्यांनी देखील उल्लेखनीय कामगिरी करत अकॅडमीची मान अभिमानाने उंचावली आहे. यामध्ये गणित विषयात केदार येणपुरे (P 92, C 92, M 100) व कुणाल मोकाटे (P 94, C 95, M 100) यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून रुखसार अत्तार (P 96, C 98, B 94, Crop Sci. 200/200) यांनी क्रॉप सायन्स या विषयामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे त्याचबरोबर लातूर सायन्स अकॅडमीमध्ये PCB व PCM या दोन्ही शाखांमध्ये उत्कृष्ट यश संपादन करत तब्बल ९८% विद्यार्थी ९१% पेक्षा अधिक गुणांसह गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये आले आहेत.
॰ आधुनिक शिक्षणपद्धतीचा यशस्वी ठसा
विद्यार्थ्यांच्या या यशामागे नियमित सराव परीक्षा, टेस्ट सिरीज, वैयक्तिक लक्ष आणि डिजिटल शिक्षणपद्धतीचा मोठा वाटा राहिला आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाची संकल्पना सोप्या आणि प्रभावी पद्धतीने समजावून सांगितल्याने त्यांचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला.
विशेष म्हणजे अकॅडमीमध्ये इयत्ता अकरावी-बारावी विज्ञान शाखेसोबतच NEET, JEE आणि MHT-CET परीक्षांसाठी फाउंडेशन, कॉलेज इंटिग्रेटेड आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे विशेष बॅचेसही राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांना बोर्ड अभ्यासासोबतच स्पर्धा परीक्षांची प्रभावी तयारी करता यावी यासाठी अनुभवी शिक्षकांकडून नियोजनबद्ध मार्गदर्शन दिले जाते.
या यशामागे अकॅडमीचे प्रिन्सिपल प्रा. संतोष गोरे सर तसेच संचालक प्रा. अक्षय गुळवे सर, प्रा. अंकुश पवार सर यांचे योग्य नियोजन, सर्व शिक्षकांची मेहनत आणि विद्यार्थ्यांची जिद्द महत्त्वाची ठरली आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून सातत्यपूर्ण सराव करून घेत प्रभावी तयारी घडवून आणली.
॰ संचालकांची प्रतिक्रियायशाबद्दल बोलताना अकॅडमीचे संचालक म्हणाले,“विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचा विश्वास आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामधील क्षमता ओळखून त्याला सर्वोत्तम घडवण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो.”
या उज्ज्वल निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Back to top button
