स्थानिक

के. बी. ग्रुपच्या गॅलेक्सी मल्टिस्टेटची बारामतीत घोडदौड; वर्षभरातच दुसरी, तर राज्यातील ८ वी शाखा सुरू

बारामती: देशात आणि राज्यात विश्वासाचे नाव बनलेल्या ‘के. बी. ग्रुप ऑफ कंपनीज’ अंतर्गत कार्यरत ‘गॅलेक्सी मल्टिस्टेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.’च्या ८ व्या शाखेचे बारामतीत  मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, बारामती शहराच्या वाढत्या विस्तारामुळे अवघ्या एका वर्षात सुरू झालेली ही दुसरी शाखा आहे.

​संस्थेचे संस्थापक-चेअरमन सचिन यादव आणि बारामतीचे नगराध्यक्ष  सचिन सातव यांच्या शुभहस्ते या नूतन शाखेचा शुभारंभ झाला. या सोहळ्यास माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, किरण तावरे, वसंत घनवट, भाऊसाहेब काटे, ॲड. खारतोडे, सौं सुजाताताई यादव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​आर्थिक प्रगतीतील विश्वासू भागीदार: सचिन यादव

​”गॅलेक्सी मल्टिस्टेटचे ध्येय केवळ आर्थिक व्यवहार करणे नसून, प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीत विश्वासू भागीदार बनणे हे आहे. गरजेच्या वेळी ग्राहकांना तात्काळ मदत करणारी आमची ‘गोल्ड लोन’ सुविधा अत्यंत लोकप्रिय ठरत आहे. भविष्यात आणखी शहरांमध्ये विस्तार करून दर्जेदार सेवा देण्याचा आमचा संकल्प आहे.”

—  सचिन यादव (संस्थापक व चेअरमन, गॅलेक्सी मल्टिस्टेट)

​गॅलेक्सी ग्रुपचा झपाट्याने वाढणारा आलेख

​कृषी, जैविक शेती, निर्यात, सहकार आणि आयुर्वेद अशा विविध क्षेत्रांत आघाडीवर असलेल्या ‘के. बी. ग्रुप’ने आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे.

​१७५ कोटींची उलाढाल: गॅलेक्सी ग्रुपने आजवर तब्बल १७५ कोटी रुपयांच्या उलाढालीचा टप्पा पार केला आहे.

​२५,००० शेतकऱ्यांना बळ: करार शेतीच्या (Contract Farming) माध्यमातून समूहाने २५,००० शेतकऱ्यांना जोडले असून, युरोपियन देशांमध्ये दररोज १५ टन शेतीमाल निर्यात केला जातो.

​रोजगार निर्मिती: समूहार्फे आजवर २,००० पेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.

​विश्वासार्ह प्रवास: फलटणमधील यशानंतर आता पुण्यात आणि बारामतीमध्ये संस्थेने आपले पाय घट्ट रोवले आहेत.

​बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांनीही संस्थेच्या कौतुकास्पद वाटचालीचा गौरव केला. बारामतीसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात गॅलेक्सीची दुसरी शाखा सुरू झाल्याने स्थानिक नागरिक, व्यापारी आणि उद्योजकांना अधिक सुलभ व विश्वासार्ह आर्थिक सेवा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button