स्थानिक
भारतीय शेतीसाठी ऐतिहासिक क्षण: ‘के.बी. बायो ऑरगॅनिक्स’च्या स्वदेशी तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक मंडळाची (CIB & RC) अधिकृत मान्यता!

फलटण — भारतीय कृषी संशोधनाने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला असून, ‘के.बी. बायो ऑरगॅनिक्स’च्या नाविन्यपूर्ण वनस्पतीजन्य पीकसंरक्षण तंत्रज्ञानाला भारत सरकारच्या ‘केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती’ (CIB & RC) कडून अधिकृत मान्यता मिळाली आहे. रासायनिक अवशेषमुक्त आणि शाश्वत शेतीसाठी हा निर्णय अत्यंत क्रांतिकारक मानला जात असून, यामुळे भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठेचे दरवाजे अधिक भक्कमपणे खुले होणार आहेत.

‘के.बी. बायो ऑरगॅनिक्स’च्या यशाची ठळक वैशिष्ट्ये:
दोन वनस्पतीजन्य फॉर्म्युलेशन्सना अधिकृत पेटंट व मान्यता:
कंपनीच्या ‘फंगो रेझ’ (थायमॉल आधारित वनस्पतीजन्य बुरशीनाशक) आणि ‘थ्रिप्स रेझ’ (पायपरीन + थायमॉल आधारित वनस्पतीजन्य कीटकनाशक) या दोन अत्यंत प्रभावी उत्पादनांना ‘सेक्शन ९(३)’ अंतर्गत अधिकृत मान्यता व पेटंट मिळाले आहे.
४८ तासांत वेगवान परिणाम आणि ‘शून्य’
ही उत्पादने फवारणीनंतर अवघ्या ४८ तासांत प्रभावी परिणाम दाखवतात. विशेष म्हणजे, यांचा ‘पीक काढणी कालावधी’ (PHI) शून्य असल्याने काढणीपूर्वी फवारणी केली तरी पिकांवर कोणताही रासायनिक अवशेष राहत नाही, जे आंतरराष्ट्रीय निर्यात मानकांसाठी (MRL) अत्यंत फायदेशीर आहे.
७५ हून अधिक संशोधकांचे कठोर परिश्रम:
संचालक मा. सचिन यादव यांच्या नेतृत्वाखाली २०१८ पासून सुरू झालेल्या या प्रवासात तब्बल ७५ हून अधिक संशोधकांनी सलग ३ वर्षे अविरत संशोधन केले. विविध कृषी विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या हवामानात चाचण्या घेऊन या तंत्रज्ञानाची वैज्ञानिक पडताळणी करण्यात आली आहे.
जागतिक बाजारपेठेत भारताचा दबदबा वाढणार:
सध्या के.बी. बायो ऑरगॅनिक्स भारतातील ११ राज्यांसह केनिया, दक्षिण अमेरिका यांसारख्या ३२ देशांमध्ये कार्यरत आहे. या मान्यतेमुळे युरोपीय, अमेरिकन आणि आफ्रिकन देशांमध्ये भारतीय सेंद्रिय उत्पादनांची मागणी आणखी वाढेल.
भविष्यातील आरोग्य आणि सुरक्षितता:
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) २०५० पर्यंत कर्करोग व मधुमेहाचे रुग्ण वेगाने वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा काळात रासायनिक अवशेषमुक्त अन्नधान्याची निर्मिती करून ‘प्रत्येक ताटात सेंद्रिय अन्न’ पोहोचवण्याचे उद्दिष्ट या तंत्रज्ञानामुळे साध्य होणार आहे.
“ही मान्यता म्हणजे केवळ आमच्या उत्पादनांची नोंदणी नसून, भारतीय संशोधन, स्वदेशी तंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीला मिळालेले बळ आहे. भारतीय शेतकऱ्यांच्या विश्वासाचा हा सन्मान आहे.”
— मा. सचिन यादव (व्यवस्थापकीय संचालक, के.बी. बायो ऑरगॅनिक्स)



