स्थानिक

गिरीधर सायन्स अकॅडमी’ ची उज्वल निकालाची परंपरा कायम ; सलग तिसऱ्या वर्षी गिरीधरचा विद्यार्थी तालुक्यात प्रथम 

फलटण : येथील ‘गिरीधर सायन्स अकॅडमी’ ने उज्वल १२ वी च्या निकालाची उज्वल परंपरा याही वर्षी कायम ठेवली आहे. यंदा सलग तिसऱ्या वर्षी गिरीधरचा विद्यार्थी तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. फलटण तालुक्यात प्रथम क्रमांकाची परंपरा कायम ठेवत शिवराज भोईटे सरांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे.

        १२ वीचा अकॅडमीचा निकाल शंभर टक्के लागला असून ८०% च्या वरती ३o विद्यार्थी तर ७५% च्या वरती मार्क असणारे ८१ विद्यार्थी आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये पार्थ दोशी या विद्यार्थ्याने ९०.१७% गुणांसह प्रथम, रिया तिवाटणे ८५.६७% द्वितीय, ईश्वरी भोंगळे ८५.३३% तृतीय, श्रेया होळे ८५.००% चतुर्थ, तर ज्ञानेश्वरी होरणे आणि समीक्षा सावळे दोन्ही ८४.८३% यांनी पाचवा क्रमांक पटकावला आहे. तर गणितामध्ये ईश्वरी भोंगळे (९८), निहाल काझी (९६), व्यंकटेश देशपांडे (९५), श्रेया होळे (९५), प्रांजली मिंड (९३), श्रुतिका चव्हाण (९२), समीक्षा सावळे (९१), वेदांतिका भोसले (९१), ज्ञानेश्वरी होरणे (९०), अंजली कदम (९०), रसायन शास्त्रामध्ये पार्थ दोशी (९४), ईश्वरी भोंगळे (९३), श्रुतिका चव्हाण (९२), स्वप्ना चोरमले (९२), जान्हवी कदम (९१), अंतरा ढलपे (९०), अंजली कदम (९०), जीव शास्त्रात पार्थ दोशी (९३), श्रेया सस्ते (९३), हिंदवी राजेशिर्के (९२), अंतरा ढलपे (८९), स्वप्ना चोरमले (८८), भौतिक शास्त्रात पार्थ दोशी (८६), श्रेया सस्ते (८२), श्रुतिका चव्हाण (८२), ईश्वरी भोंगळे (८१), श्रेया होळे (८१), ज्ञानेश्वरी होरणे (८०) यांनी सदर गुण प्राप्त केले आहेत.

       या सर्व विद्यार्थ्यांना अकॅडमीचे संचालक शिवराज भोईटे, मयूर भोईटे, मंदार पाटसकर, अमर पाटील या तज्ज्ञ शिक्षकवृंदाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि गिरीधर सायन्स अकॅडमी परिवाराचे अभिनंदन व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button